"रंगक्षितीज सांस्कृतिक प्रतिष्ठान" या नावाने २०१६ साली नाट्य संस्था स्थापन झाली. पुढे "रंगक्षितीज डान्स अँड ड्रामॅटिक स्कुल" या नावाने नृत्य, नाट्य कार्यशाळा घेऊन विद्यार्थी, बालकलाकार, प्रौढ आणि गृहिणी यांना रंगमंच मिळवून देण्याचे काम आज पर्यंत संस्था प्रामाणिकपणे आणि सातत्याने करीत आहे. तसेच "रंगक्षितीज पिक्चर्स" या संस्थे अंतर्गत लघुपटांची निर्मिती करून, फ्रान्स, मुंबई, पुणे, गोवा या आणि अशा मोठ्या लघुपट महोत्सवांसाठी लघुपट निर्मिती करून अनेक नामांकने मिळवून बक्षीस मिळविली आहेत.
तसेच संस्था स्थापन झाल्या पासून आंतरशालेय स्पर्धा उपक्रम राबवित आहे. छोटा शिशु, मोठा शिशु, (ज्युनियर केजी, सिनियर केजी) इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, रंगभरण, चित्रकला, हस्तकला, वेशभूषा, नृत्य, गायन, वाद्य, निबंध, वकृत्व, क्रीडा अशा अनेक स्पर्धांमध्ये मुलं सहभागी होऊन पारितोषके मिळवितात. संस्था विद्यालय, महाविद्यालयात असे अनेक उपक्रम राबवित असते. तसेच संस्थे कडून पारितोषिक स्वरुपात मानचिन्ह, सन्मानचिन्ह (ट्रॉफी), पदके (मेडल्स) आणि सन्मानपत्र (सर्टिफिकेट) देऊन विद्यार्थ्यांच्या कलेचा गुणगौरव सोहळा साजरा केला जातो.
एकांकिका, बालनाट्य, द्विपत्री, एकपात्री, लघुपट, अभिनय, नृत्य आणि संगीत या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन शाळेच्या वेळेत पूर्ण तयारी करून रंगमंचावर सादरीकरण करण्याची संधी शाळेच्या मार्फत "रंगक्षितीज सांस्कृतिक प्रतिष्ठान" या संस्थेकडून दिली जाते.