मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना गिरीश महाजन जामनेर, नगराध्यक्ष, यांच्या हस्ते "फिंगरप्रिंट" या लघुपटाला द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
फ्रान्स फिल्म फेस्टिवल २०१८ या फिल्म फेस्टिवल मध्ये "क्रॅक" या लघुपटाने १५० स्पर्धकांमध्ये नामांकन मिळविले.
कलांकुर करंडक २०२४ या स्पर्धेत रंगक्षितीज डान्स अँड ड्रामॅटिक स्कूल या संस्थेचा विद्यार्थी विराज रवींद्र तारवे लक्षवेधी अभिनय म्हणून निवड.
जे. ई. एस. करंडक २०२४ या स्पर्धेत रंगक्षितीज डान्स अँड ड्रामॅटिक स्कूल या संस्थेचे विद्यार्थी "विराज रवींद्र तारवे" "मनस्वी रोहित जांभळे" या दोघांनीही लक्षवेधी अभिनय पुरस्कार मिळविला.
रोटरी क्लब डोंबिवली येथे बालमहोत्सव २०२४ यात सहभाग घेऊन रंगक्षितीज डान्स अँड ड्रामॅटिक स्कूल या संस्थेचे विद्यार्थी विराज रवींद्र तारवे, मनश्री रोहित जांभळे आणि शुभ्रांशु प्रदीप पवार या तिघांनाही लक्षवेधी अभिनय पुरस्कार मिळाला व नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला.
अखिल नटराजम अंतर सांस्कृतिक संघ ऑल इंडिया २१ व्या कल्चरल नॅशनल डान्स कॉन्टॅक्ट अँड फेस्टिवल २०२६ या नृत्यसंस्कृती स्पर्धेत मनश्री गोंधळी, जिया रायकर, मीरा ढेबे आणि आराध्य सावंत यांनी प्रत्येकी द्वितीय क्रमांक मिळवला.
सांस्कृतिक कलादर्पण नाट्यमहोत्सव २०२५ या नाट्यमहोत्सवात रंगक्षितीज डान्स अँड ड्रामॅटिक स्कूल या संस्थेकडून "भूतबीत काही नसतं" या नाटकासाठी द्वितीय क्रमांक मिळवला.
बालरंगभूमी आयोजित "जल्लोष लोककलेचा" या नृत्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नृत्य व लक्षवेधी स्पर्धक अशी निवड करून सर्वोत्कृष्ट नृत्याचा पुरस्कार मिळविला.